दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
लातूर/प्रतिनिधी -दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमा उपस्थित सर्व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांकडून वृक्षरोप व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी मंचावर कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गणेश लहाने, प्रमुख उपस्थिती आयक्यूएसी. समन्वयक डॉ. बालाजी कांबळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. मनीषा अष्टेकर, एन.ई.पी समन्वयक डॉ ब्रिजमोहन दायमा, बँकिंग अँड इन्शुरन्स समन्वयक डॉ. निखिल व्यास,में शिक्षणसंस्था संचलित, दयानंद कला बीसीए विभागप्रमुख 'शशिकांत स्वामी, बीबीए विभाग प्रमुख डॉ.वैशाली सातपुते यांची उपस्थित होती.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. गणेश लहाने यांनी अध्यक्षीय भाषण केले. आईक्यूएसी समन्वयक डॉ. बालाजी कांबळे, एन. इ. पी समन्वयक डॉ. ब्रिजमोहन दायमा व प्रा. अजय चव्हाण यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी शिंदे व सुप्रिया सुळे या विद्यार्थिनींनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने