मराठा समाज आक्रमक ; चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

मराठा समाज आक्रमक ; चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे
लातूर/प्रतिनिधी -जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या घटनेमुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने अकोला जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला येथे येत असताना. त्यांना काळे झेंडे दाखवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे लाठीचार्ज केला. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. विरोधकांनी राज्य सरकावर आरोपांचा भडिमार करत उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जालना जिल्ह्यातील घटनेमुळे समाजाच्या रोषाला भाजप नेत्यांना सामोरे जावे लागत आहे.
हे भाजपच्या संवाद यात्रेसाठी अकोला येथे येत असताना शेळद फाटा खामगाव अकोला महामार्गावर त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन करण्यात आहे. सकल मराठा समाज बाळापुरच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.दरम्यान, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यांना अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी सकल मराठा समाजाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने