भारत, इंडिया, हिंदुस्थान अन् रितेश देशमुखने देशाच्या नावांबद्दल घेतला पोल

भारत, इंडिया, हिंदुस्थान  अन् रितेश देशमुखने देशाच्या नावांबद्दल घेतला पोल
देशात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ नावावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भारताचं इंग्रजी नाव ‘इंडिया’ आहे ते बदलून सगळीकडे ते ‘भारत’ केलं जाणार असल्याची जोरदार सुरू आहे. या वादावर अनेक राजकारणी व सेलिब्रिटी आपली मतं मांडत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर एक पोल घेतला आहे.रितेशने एक ट्वीट केलं आहे. ज्यात भारत, इंडिया, हिंदुस्थान व सगळी नावं सारखीच असे चार ऑप्शन दिले आहेत. त्या पोलसाठी ‘तुम्हाला काय वाटतं?’ असं कॅप्शन रितेशने दिलं आहे. बातमी लिहेपर्यंत त्यावर लोकांनी वोट दिले आहेत. त्यानुसार, भारतला २८.६ टक्के, इंडिया २४ टक्के, हिंदुस्थान ४.१ टक्के व सगळी नाव सारखी या पर्यायाला ४३.३ टक्के वोट मिळाले आहेत.

रितेश देशमुखने घेतलेला पोल
रितेशच्या या ट्वीटवर लोक कमेंट्सही करत आहेत. ‘भाऊ सगळी नावं सारखीच आहेत’, ‘भारत, इंडिया, हिंदुस्थान ही सगळी नावं सारखीच आहेत,’ असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी भारत व काहींनी इंडियाचा उल्लेख कमेंट्समध्ये केला आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंडिया नाव न वापरता भारत हेच नाव वापरण्याचं धोरण केंद्र सरकारने राबवल्याचं दिसून येत आहे. देशाच्या राष्ट्रपतींकडून जी-२० देशांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनात देशाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने