भैरैश्वर महिला मंडळाने महिलांना साडी चोळी वाटप करून जनजागृती केली

भैरैश्वर महिला मंडळाने महिलांना साडी चोळी वाटप करून  जनजागृती  केली
औसा/प्रतिनिधी-भैरेश्वर महिला मंडळ सिल्लोड ही एक सामाजिक संस्था सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी शेतमजूर यांच्यासह
समाजातील वंचित घटक व महिलांच्या विकासासाठी कार्यरत असून या संस्थेने समाजाच्या विविध क्षेत्रातील विकासासाठी
नवीन उपक्रमांच्या माध्यमातून समाज जागृती चे अभिनव कार्य हाती घेतले आहे. औसा तालुक्यातील शेतकयांच्या
शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करून शेतक-यांचे सोयाबीन, हरभरा हमीभावाने
घेण्याचा संस्थेचा मानस आहे. महिलांना शेतीपुरक उद्योगातून तसेच दुग्धव्यवसायच्या माध्यमातून नाबार्डच्या सौजन्याने
महिला शेतकयांच्या आर्थिक प्रगतीसाठी संस्था कार्यरत असून भैरेश्वर महिला मंडळाच्या वतीने जवळगा पोमादेवी येथे
नागरसोगा, दापेगाव, जवळगा (पो. ), हरेगाव आणि संक्राळ या गावातील सुमारे २५० महिलांना साडी-चोळी चे वाटप
करण्यात आले. मागील एक महिन्या पासून औसा तालुक्यामध्ये पाऊस गायब झाल्यामुळे या परिसरातील शेतकरी व
शेतमजूर महिला यांच्यासह सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असताना भैरेश्वर महिला मंडळ सिल्लोड या संस्थेने
पाच गावांमधील महिलांना साडी चोळीचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम नाबार्डचे डी. डी. एम. प्रमोद पार्टील यांच्या
उपस्थितीमध्ये राबविला. यावेळी सरोजा भास्कर शिंदे सरपंच नागरसोगा, सौ. सुजाता सुधीर बनसोडे सरपंच जवळ्गा,
मारूती पाडोळे सरपंच दापेगाव, संजय मसलकर सरपंच हरेगाव आणि रामसिंग राजपूत पोलीस पाटील संक्राळ यांच्यासह
ग्रामसेवक अजित वागलगावे व इतर मान्यकर उपस्थित होते. भैरैश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता पार्टील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश मनोहर, मधुकर केंद्रे, कुणालसिंग राजपूत,प्रणिता स्वामी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने