हैद्राबाद मुक्ती संग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्यावर व्याख्यानांचे आयोजन- विवेकानंद दत्तोबा भोसले

 हैद्राबाद मुक्ती संग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्यावर व्याख्यानांचे आयोजन- विवेकानंद  दत्तोबा भोसले
औसा -तालुक्यातील देवताळा येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी असुन तिथे दहावी उत्तीर्ण वा पुढील शिक्षण घेतलेल्या युवा युवतींना पोलीस,सैन्य दल व राज्य आणि केंद्र राखीव संरक्षण दलातील विविध प्रकारच्या नौकरीत
पात्र ठरण्यासाठी पुर्व प्रशिक्षण दिले जाते.या संस्थेचे संचालक विवेक दत्तोबा भोसले यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने पंच्याहत्तर गावातुन हैद्राबाद मुक्तिसंग्राम व क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान या विषयावर व्याख्यानांचे आयोजन केले आहे. 
विशेष रोज वेगवेगळ्या दहा गावात दहा व्याख्याते सलग आठ दिवस व्याख्याने देतील.असे नियोजन करण्यात आले आहे. 
दि16/8/2023रोजी सर्व व्याख्याते देवताळा येथे एकत्र येऊन क्रांतिवीरांना आदरांजली वाहतील. दि 17/8/23पासुन वेगवेगळ्या किमान 75गावी व्याख्याने देतील. यामध्ये मार्गदर्शन प्रा. दत्तात्रय सुरवसे खरोसा, बालाजी जाधव उजेड,ब्रिजलाल कदम लातूर, श्रीम नीता मगर मुरूड, प्रा नयन राजमाने लातूर, सोमनाथ काजळे सारोळा, अंगद वाघमारे सारणी, जगदीश पाटील करजखेडा,चंद्रकांत जाधवर मंगरूळ,सुधाताई कांबळे लातूर, सतिश भोसले किल्लारी व संजय भोईटे मुख्याध्यापक हिप्परगा अशी व्याख्यात्यांची नावे आहेत. ते शाळा,महाविद्यालये, ग्रामपंचायती,महिला मंडळे,महिला बचत गटातुन सकाळी 11ते12किंवा दुपारी 3ते4या वेळात हैद्राबाद मुक्तिसंग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या जीवनावर भाष्य करतील. 
  प्रथमच एका संस्थेने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे हैद्राबाद मुक्तिसंग्राम जनमानसाना समजून येईल असे या उपक्रमाचे सहाय्यक कमलाकर सावंत यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने