औसा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भोजने कुटुंबास सांत्वनपर मदत

औसा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भोजने कुटुंबास सांत्वनपर मदत
औसा/ प्रतिनिधी- तालुक्यातील हिप्पारगा ता. औसा येथील शेतकरी गोपाळ भोजने यांचा लाईटच्या डीपी चा डिओ बसवत असताना अचानक विदयुत प्रवाह सुरु झाल्याने झटका बसून मृत्यू झाला होता. त्या कुटुंबियांशी बाजार समिती सभापती चंद्रशेखर तात्या सोनवणे यांनी सांत्वन पर भेट देऊन आर्थिक मदत केली.
या वर्षी खरीप हंगाम पावसाविना जात असताना शेतकरी आपल्याकडे असलेल्या विहीर बोअर मधील पाणी पिकाला देण्यासाठी लाईटची देवासारखी वाट पाहत असताना आज ही दिसतोय. गोपाळ भोजने हा सामाजिक चळवळीत शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनात सहभागी असणारा शेतकरी म्हणून ओळख होती.गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.शेतकरी संघटनेचे राजेंद्र आबा मोरे, राजीव कसबे आणि सरपंच संतोष गोरे यांनी पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी जनतेला आवाहन केले होते त्या आवाहनाला लोकांनी मोठा प्रतिसाद देत भोजने कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले.
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने सभापती चंद्रशेखर तात्या सोनवणे, उपसभापती प्रा.भीमाशंकर राचट्टे आणि सर्व संचालक मंडळाने आर्थिक मदत करून ही बाजार समिती शेतकऱ्याच्या सुखदुःखात सहभागी असल्याची भूमिका दाखवून दिली. 
पुढे सुद्धा सामाजिक कार्यासाठी संस्था निश्चितच काम करेल.भोजने कुटुंबाला चेक देताना सभापती चंद्रशेखर तात्या सोनवणे,सचिव संतोष हुच्चे, राजेंद्र मोरे, संतोष गोरे, राजीव कसबे व कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने