रामनाथ मध्ये शिक्षक दिन उत्साहात

रामनाथ मध्ये शिक्षक दिन उत्साहात 
 आलमला-श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत विद्यालयातील मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व श्री प्रभाकर कापसे सर यांच्या शुभ हस्ते विद्यालयातील सर्व शिक्षकांचा , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचा गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला .याप्रसंगी सर्व शिक्षकांचे संस्थेच्या वतीने स्वागत करून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांनी दिल्या .या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक पी.सी. पाटील व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक  अंबुलगे रंगनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी भास्कर यांनी केले व आभार प्रा. शरण धाराशिवे यांनी मांडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने