स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीचे अतुलनीय कार्य केले-कमलाकर सावंत

स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीचे अतुलनीय कार्य केले-कमलाकर सावंत
औसा :मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवाचे निमित्ताने जिल्हाधिकारी लातूर ,महसुल व वनविभाग तहसीलदार कार्यालय औसा यांच्या वतीने भव्य तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भव्य ग्रंथ व छायाचित्र प्रदर्शन व्याख्यानमाला व बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. त्या निमित्ताने औसा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक पाल्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.श्री अभिमन्यू पवार आमदार औसा, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सुर्यवंशी ,विवेकानंद भोसले केनामेटल कंपनी आशिया मॅनेंजिग डायरेक्टर आणि व्याख्याते कमलाकर सावंत व गणमान्य व्यक्तीं यांची प्रमुख उपस्थिती होती. 
सर्व प्रथम मान्यवरांचा सत्कार व स्वातंत्र्य सैनिक पाल्य यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
तालुक्यातील विविध शाळेतुन विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्र स्तवन केले. त्यानंतर भरत सुर्यवंशी तहसीलदार प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर कमलाकर सावंत यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम, आणि क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान या विषयावर् व्याख्यान दिले. आ. अभिमन्यू पवार आमदार यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण व्यक्त करून भावी काळात क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे भव्य स्मारक व लोकोपयोगी केंद्र औसा परिसरात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी मी व्यक्तीश:प्रयत्न करणार असे अभिवचन दिले. त्यानंतर यशस्वी स्पर्धक,परिक्षक यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हलकुडे यांनी केले तर मुक्तेश्वर विद्यालय औसा व शिक्षण विभाग पं स औसा यांनी मोलाचे सहकार्य केले. 
प्रा सुनील पुरी यांनी तयार केलेल्या ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने