साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जवळगा पोमादेवी येथे उत्साहात साजरी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जवळगा पोमादेवी येथे उत्साहात साजरी
औसा/प्रतिनिधी-तालुक्यातील जवळगा पोमादेवी येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . सार्वजनिक जयंती समिती तर्फे गावांत विविध उपक्रम साजरे करण्यात आले.गावामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान ग्रामदैवत पोमादेवी माता यांची प्रतिमा देण्यात आली.
यावेळी गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच गावांतील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते सचिन पाटील,प्रकश काकडे,सचिन माळी,मनोज बनसोडे,सतीश बनसोडे, अविनाश गायकवाड आदी.उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने