लातूर कॉलेज ऑफ फार्मसी येथे आ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विग्नहर्ता चे विसर्जन

लातूर कॉलेज ऑफ फार्मसी येथे आ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विग्नहर्ता चे विसर्जन
औसा (प्रतिनिधी ) स्मार्टफोन च्या दुनियेत फार्मसी महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी चा सहभाग पाहून मा. आमदार अभिमन्यू पवार यांनी आनंद व्यक्त करत महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि गणरायाला निरोप देण्यात आला असून हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव   महाविद्यालयामध्ये LCOP चा राजा गणपतीची स्थापना प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले होते आणि मा. आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विग्नहर्ता चे विसर्जन करण्यात आले .  तसेच  याप्रसंगी संतोष अप्पा मुक्ता,सुभाष जाधव संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,   संचालक नंदकिशोर बावगे, मुलगे आत्माराम, प्राचार्या  डॉ. श्यामलीला जेवळे (बावगे)  आणि मुख्याध्यापक कालिदास गोरे यांच्या हस्ते अंतिम पुजा करण्यात अली.
       हासेगाव फार्मसी महाविद्यालयांमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थी सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला.
           याप्रांसगी लातूर कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी  लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय  हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर  सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم