त्यांनी अडीच वर्षे विकास निधी अडविला आम्ही पुन्हा चालू केला-आ.संभाजी पाटील निलंगेकर

त्यांनी अडीच वर्षे विकास निधी अडविला आम्ही पुन्हा चालू केला-आ.संभाजी पाटील निलंगेकर 
निलंगा(प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट निर्माण होणार आहे 2018 -19 वर्षा सारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. 1972 साली अन्नधान्याची मोठी टंचाई होती परंतु पिण्याचे पाणी उपलब्ध होते परंतु आज पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य नाही त्यामुळे आजची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत टिकवून ठेवा अशी विनंती करून म्हणाले आपण पालकमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्ह्यात व लातूर महानगरपालिकेत कसलाही भेदभाव न करता समान विकास निधीचे वाटप केले परंतु अमित देशमुख पालकमंत्री असताना अडीच वर्षात कसलाही विकास निधी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी दिला नाही विकास कामात सापत्वाची वागणूक दिली त्यामुळे मतदारसंघाची विकास कामे रखडली मागील एक वर्षात आपले सरकार आल्यापासून मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला असून पुन्हा विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू झाले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले
दि 16 ऑक्टोबर रोजी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले त्यावेळी बोलत होते
“नवरात्र महोत्सवात निलंगा मतदार संघातील 61 गावांना भेटी देऊन, विविध विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण व पाहणी करून जनतेशी संवाद माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर साधत आहेत
यावेळी चेअरमन दगडू सोळुंके ,संतोष वाघमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे,भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे बाजार समिती संचालक गुंडेराव जाधव ,धनराज माने,उपसरपंच संभाजी उसनाळे ,माजी सरपंच सुनिल वरवटे,नयन माने,विलास पाटील,मोहन माने,मारुती शिंदे,प्रकाश पाटील,दत्ता भरगांडे, युवराज झरे,दिगंबर असरवाडकर,कांतप्पा डांगे,राजप्पा उडबळे,अंगद माने,उपस्थित होते
पुढे बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले पंचवीस दिवसापेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनचे पिकात 40 ते 50 टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर महसूल आणि कृषी विभागाने त्यासाठी अनुकूल असा अहवाल पाठवला आहे त्यामुळे आपल्या मंडळात 100% पीक विमा मिळणार आहे. अत्यल्प पाऊस आणि वाढलेल्या गर्मीमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून अत्यल्प पेरण्या होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
बारामाही नद्या वाहण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. त्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याची आपली तयारी असून आपल्या भागात पाणी आल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी बोलून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले शेतकऱ्याला सुरळीत आणि मुबलक वीज पुरवठा करण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाची भरीव तरतूद केली असून हा निधी डीपी व इतर विज उपकरणासाठी वापरला जाणार आहे. महाराष्ट्रात कमी कालावधीत सर्वाधिक डीपी निलंगा वीज वितरण विभागाला मिळाल्या आहेत,आगामी काळात डीपी खराब होणे व वीज संकटाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागणार नसल्याचे अभिवचन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित गावकरी आणि शेतकऱ्यांना दिली दिले
चौकट,,,गावातील समस्या गावातच सोडविल्या जात आहेत.
निलंगा विधानसभा मतदार संघातील या नवरात्र उत्सवात आ. निलंगेकर याचा गाव भेट दरम्यान विकास कामाचे लोकार्पण, उदघाटन, व विकास कामाची पाहणी चालू आहे. गावकऱ्यांनी गावातील शेती ,वीज,पाणी,शिक्षण, महिला बालविकास,आणि रस्ता व शेत रस्त्याची सांगितलेली समस्या संबधित अधिकाऱ्याला सांगून जागीच सोडविली जात असल्यामुळे गावातील जनतेकडून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या या गावभेट कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच सुनील वरवटे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय भरगनडे यांनी केले तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने