पीकविमा २५% अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करा नाही तर जेलभरो आंदोलन करणार - शेतकरी नेते सचिन दाने यांचा इशारा

पीकविमा २५% अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांचा खात्यावर जमा करा नाही तर जेलभरो आंदोलन करणार  - शेतकरी नेते सचिन दाने यांचा इशारा
लातूर/प्रतिनिधी: लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप २०२३ अंतर्गत सोयाबीन पिकासाठी ऑगस्ट महिनाभर पावसाचा खंड पडल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचना नुसार SBI पीकविमा कंपनी ने जिल्ह्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ २५% अग्रिम रक्कम आठ दिवसात जमा करावी अन्यथा लातूर जिल्ह्यातील शेतकरी जेलभरो आंदोलन करणार असा इशारा शेतकरी नेते, शिवसेना मा उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला. जिल्ह्यात सर्व महसूल मंडळातील सर्वेक्षण करून , जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी अधिसूचना जारी केली, त्याला आता एक महिना झाला तरी SBI पीकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या हककाचा २५% टक्के अग्रिम रक्कम देण्याचे नाव घेत नाही.जिल्ह्यातील एक ही शेतकरी वंचित राहू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावे .सोयाबीन पिकावर या आठवड्यात येलो मोझाक रोग पसरल्यामुळे पिके धोक्यात आल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.त्यांना पंचनामा करून शासकीय मदत मिळावी. यावर्षी ची पूर्वसूचना , इंटिमेशन दिलेल्या शेतकऱ्यांची यादी पीकविमा कंपनी ने जाहीर करावी.यांबंधी या सोयाबीन काढणी पर्यंतच्या हंगामात प्रशासकीय बैठक लावून पीकविमा कंपनीस आवश्यक प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात यावेत .शेतकरी सन्मान निधी योजनेचे गेली ४ महिने प्रलंबित असलेले प्रकरणे निकालात काढावीत व होणारा भ्रष्टाचार थांबवावा.अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वरील न्याय मगाण्या मान्य कराव्यात व शेतकऱ्यांवर एसबीआय पीकविमा कंपनी कडून होणारा अन्याय थांबवावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि जेलभरो आंदोलन करणार असा निर्वाणीचा इशारा शेतकरी नेते, शिवसेना मा उपजिल्हाप्रमुख सचिन दाने व शेतकऱ्यांनी शेतकरी क्रांती आंदोलन च्या वतीने दिला आहे.यावेळी निवेदन देताना रोहित कासगुडे , आकाश बोडके, रोहित शिंदे व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने