राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधामध्ये वस्तू वाढवताना पुरवठा विभागाने केली वजनात घट

राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधामध्ये वस्तू वाढवताना पुरवठा विभागाने केली वजनात घट
 
मुंबई -मुख्यमंत्री शिंदे सरकारने सणासुदीला गरिबांना गोड-धोड करता यावे, यासाठी शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली. मात्र, असे करताना यंदा त्याच्या वजनात घट झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आनंदाचा शिधा योजना सुरू केली. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्याविषयी सातत्याने किती लोकांना लाभ मिळाला याची माहिती सतत देत असतात. मात्र, यंदा ऐन दिवाळीत त्या वस्तूंच्या वजनात घट झाली आहे.

यामध्ये शिधापत्रिकाधारकांना चारऐवजी सहा शिधावस्तूंचा संच देण्यात येणार आहे. त्यामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दोन वस्तूंत वाढ करताना शासनाने चार वस्तूंचे वजन एक किलोवरून अर्धा किलोवर घटविले आहे. त्यामुळे विरोधकांना हा चांगला राजकीय मुद्दा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयावरून विरोधकांनी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने