विद्यार्थ्यांनी स्वतःला काळानुरुप बदलणे गरजेचे- प्रा. सेनमा चिराग

विद्यार्थ्यांनी स्वतःला काळानुरुप बदलणे गरजेचे- प्रा. सेनमा चिराग 
मुरुम (प्रतिनिधी) : वैद्यकीय व इंजिनियरिंग क्षेत्रात करिअर करावयाचे असेल तर जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची पराकाष्टा करुनच  विद्यार्थ्यांनी स्वतःला काळानुरुप बदलणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लातूर येथील आयआयबीचे प्रमुख प्रा. सेनमा चिराग यांनी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करिअरच्या संधी या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.  प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बापूराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम मित्र परिवाराकडून शुक्रवारी (ता. २७) रोजी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी आयआयबीचे प्रा. शिवशंकर बुरांडे, कंटेकूरचे माजी सरपंच गोविंद पाटील, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, बबनराव बनसोडे, विकासेसोचे माजी व्हाईस चेअरमन प्रमोद कुलकर्णी, मुख्याध्यापिका महानंदा रोडगे, सूर्यकांत जाधव, श्रीकांत बेंडकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.       पुढे बोलताना प्रा. चिराग म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नीट व जेईई परीक्षांविषयी कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नये. या परीक्षेला धैर्याने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. आपण या परीक्षेचा सतत सराव व प्रयत्न करून यश संपादन करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. गौस शेख, राजू मुल्ला, अशिष वेदपाठक, ओमकुमार चव्हाण आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास घुरघुरे यांनी केले. सूत्रसंचलन श्रीराम कुलकर्णी तर आभार डॉ. अशोक सपाटे यांनी मानले. यावेळी दहावी, अकरावी व बारावीचे विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने