मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा

मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा
देवणी/ प्रतिनिधी-महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसानगर - फुलेनगर येथून उप जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला
महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागासले पण दूर करण्यासाठी आरक्षण देणे गरजेचे आहे तात्कालीन राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक आरक्षण देण्याची घोषणा केली होती उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम आरक्षण जैसे थे ठेवण्यात आले आहे,परंतु राज्य सरकारकडून मुस्लिम आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही ,राज्यातील शिक्षणापासून वंचित असलेला मुस्लिम समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शुक्रवारी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उदगीरात मोर्चा काढण्यात आला, फुलेनगर-मुसानगर चौकातून मोर्चास प्रारंभ झाला, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर झाकिर हुसेन चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, जय जवान चौक, नगरपरिषद, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला, या मोर्चामध्ये सहभागी तरुणांनी हातात फलके घेऊन मुस्लिम आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे,
उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या भारतीय दलित पँथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सांगळे यांच्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठीच्या बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषणास मोर्चेकरांनी मोर्चाद्वारे पाठिंबा दिला,यावेळी फिरोज पठाण, मुन्ना मदारी, अझहर शेख, खाजा शेख, ताहेर शेख, इब्राहिम नाना पटेल, खाजा पटेल, अखिल शेख, मझहर पटेल, नौशाद मौलाना, अहमद सरवर, इरफान शेख, मुक्रम जागीरदार, सोपी मदारी, समद बागवान, हमीद शेख, जावेद बागवन, मगदूम पटेल, रशीद बलदर, अक्रम जहागीरदार, अखिल मोमीन, एजाज सय्यद, निसार शेख खिजर मोमीन, आदिसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने