जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून युवकांचे केले कौतुक ...!!

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून युवकांचे केले कौतुक ...!!
लातूर- जिल्हा क्रीडा संकुलावर अनेक लोक सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी येत असतात. रोजच्या सारखेच 9 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी मैदानावर धावत असताना श्री. शितल बंडू मेखले अचानक जमिनीवर कोसळले. तिथेच व्यायाम करणाऱ्या नागरिक व पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बाजूला गराडा घातला.... पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांच्या चमुतील श्री सिद्धेश्वर  चाटे (माजी सैनिक), श्री विष्णू सोडगीर(पोलीस दलात निवड), श्री परमेश्वर बिराजदार,श्री सतीश मुंडे, श्री धीरज काटे,शेख व अन्य मुलांनी तात्काळ परिस्थिती चे गांभीर्य पाहून लोकांना दूर करून श्री शीतल मेखले यांच्या पायातील शूज काढले,अंगातील शर्टने हवा मारून सी पी आर द्यायला सुरुवात केली. छाती दाबून तोंडाने कृत्रिम श्वास दिला.4 ते 5 मिनिटाच्या या कृतीने शीतल मेखले हे थोडी हालचाल करू लागले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना उचलून मैदानाच्या बाहेर आणले. तोपर्यंत श्री शीतल मेखले यांचे मित्र तुकाराम भालके व सचिन हांडे यांनी अपोलो हॉस्पिटल ,नंदी स्टॉप लातूर येथील डॉ श्री मनोज कदम यांना कॉल करून ऍम्ब्युलन्स बोलावून घेतली.श्री शितल मेखले याना दवाखान्यात ऍडमिट करून पुढील उपचार चालू केले. आता ते उत्तम आहेत. आज या सर्वांना बोलावून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी मेखले यांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
    जिल्हाधिकारी यांनी 6 ऑक्टोबर रोजी विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील भेटीत तिथल्या प्राध्यापकांना प्रथमोपचार माहिती नसल्यामुळे अनेक रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पडतात. अशा वेळी त्यांना सी.पी. आर जर दिला तर ती व्यक्ति वाचू शकते. त्यासाठी सी. पी. आर देण्यासाठी ग्रामीण भागा पर्यंत प्रशिक्षण देण्याची सूचना केली होती. मेखले यांचा अनमोल जीव या सी.पी.आर मुळे वाचला.. असे प्रशिक्षण दिले तर अनेकांचा जीव वाचू शकतो हे या उदाहरणावरून लक्षात आले. अधिकाधिक लोकांनी सी पी आर शिकून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी यनिमित्ताने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने