ग्रंथपाल पठाण यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

ग्रंथपाल पठाण यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
औसा/प्रतिनिधी -येथील आझाद महाविद्यालयातील ग्रंथपाल असद पठाण हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.या सेवानिवृत्तीबद्दल महाविद्यालयात शनिवारी आयोजित कार्यक्रमात त्यांचा सपत्नीक शाल,पुष्पहार,सन्मानचिन्ह, भरपेहराव देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य टी.ए.जहागीरदार हे होते. यावेळी प्रा.एम.बी झाडे,प्रा.डॉ एम.ए बरोटे,प्रा.डॉ.डी.ए शिंदे,प्रा.डॉ.एन.के सय्यद यांनी आपली मनोगते व्यक्त केली,तसेच असद पठाण यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयातील सहकार्यासोबतचे अनुभव सादर करून संस्थेचे आभार व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना टी.ए जहागीरदार यांनी असद पठाण यांनी ग्रंथालयात काम करीत असताना त्यांची कामाविषयी निष्ठा,ग्रंथालय पुस्तकांनी सुसज्ज करण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती सांगितली.सूत्रसंचालन प्रा.डॉ.व्ही.व्ही गायकवाड यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने