28 वर्षानंतर शिक्षक व विद्यार्थी एकत्रित,महाराष्ट्र विद्यालयाचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा

28 वर्षानंतर शिक्षक व विद्यार्थी एकत्रित,महाराष्ट्र विद्यालयाचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा 
निलंगा/प्रतिनिधी-महाराष्ट्र विद्यालयातील 1995 साली 10वी वर्गात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.यात तब्बल 28 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधून शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. हा मेळावा येथील अव्युक्त हाॕटेलमध्ये उत्साहात पार पडला.
         यावेळी या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे तत्कालीन शिक्षकवृंद एस के पवार, व्ही एस चौधरी, व्ही एन जगताप, पी एस सगरे,जे जी पाटील,व्ही एस शानिमे, व्ही एम लोंढे,डब्लू एम पंचशिले, आर आर जाधव, आर पी भुजंगे, शीला देशमुख उपस्थित होते. सकाळ सत्रात सर्वांनी 28 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.प्रत्येकाने स्वतःचा परिचय,शैक्षणिक पात्रता,व्यावसायिक अनुभव व शालेय जीवनातील आठवणी याबाबत मोकळेपणानं मनोगत व्यक्त करुन एकमेकांची मने जिंकली. आजच्या धावपळीच्या काळात माणुसकी हरवत चाललेली असताना आपण 28 वर्षानंतरही आम्हा गुरुजनांची आठवण करुन सन्मान केलात हाच आमच्या जीवनातील पुरस्कार आहे अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या .
          तत्पूर्वी सुरेश नाटकरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून स्नेह मेळाव्याची भुमिका विशद केली.रविराज मोरे यांनी सूत्रसंचलन तर डाॕ क्रांती सातपुते यांनी आभार व्यक्त केले.      
     दुपार सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अंताक्षरी, संगीत खुर्ची , गाणी अशा बालपणीच्या खेळांचा आनंद घेतला. तसेच डाॕ नितीश लंबे व दिपाली बेळंबे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
        या कार्यक्रमासाठी प्राजक्ता पाटील निलंगेकर, अॕड. राजश्री रेड्डी, डाॕ क्रांती सातपुते,दिपाली बेळंबे, ममता अट्टल अनुसया नागदे, अर्चना माने,माया चोपणे, अरुणा जाधव,कांचन लातूरे,अर्चना जोगदंड,डाॕ नंदकिशोर शिंदे,डाॕ नितिश लंबे, सुरेश नाटकरे,रविराज मोरे,संजय जगताप, अविनाश बोलसुरे,कैलास वाडीकर,मारुती नागदे,भगवान सोमवंशी,अविनाश पुजारी, सतिश भोपी,संतोष भोपी,फिरोज काद्री,संतोष सातपूते असे जवळपास 35 विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी होणायसाठी सर्व विध्यार्थानी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने