यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने गुरुजनांचा सत्कार संपन्न

यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने गुरुजनांचा सत्कार संपन्न
नांदेड : जिल्ह्यातील रोही पिंपळगाव येथील यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.
   एक दिवस गुरुजनासोबत या उपक्रमात माजी उपप्राचार्य भु. द.वाडीकर, प्रा. डॉ. भरतसिंह गहलोत या गुरुजनांचा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी वाडीकर सरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी सांगितल्या तर गहलोत सरांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.नारायण शिंदे हे गेल्या २५ वर्षांपासून यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने विविध उपक्रम राबवून साहित्यिक आणि सामाजिक चळवळ पुढे नेत असतात.गेल्या २५ वर्षांपासून राज्यातील साहित्यिकांना त्यांच्या कलाकृतीला पुरस्कार देवून गौरव करतात.मंचच्या वतीने साहित्य संमेलन, कविसंमेलन, विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला, शेतकऱ्याला सन्मानित करीत असतात.त्याचाच एक भाग म्हणून आज यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त एक दिवस गुरुजनासोबत या उपक्रमात गुरुजनांचा सत्कार केला.यावेळी मंचचे सचिव अनमोलसिंग कामठेकर, डॉ.गोविंद भाकरे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم