देवणी बाजार समितीस राज्य उपसभापती संतोष सोमवंशी यांची सदिच्छा भेट

देवणी बाजार समितीस राज्य उपसभापती संतोष सोमवंशी यांची सदिच्छा भेट
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी येथील मासिक बैठकीस महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी सदिच्छा भेट घेऊन मार्केट यार्डाच्या उन्नती साठी सखोल असे मार्गदर्शन केले.
     देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीला आता चांगले दिवस येत असून येथे शेतकऱ्यांसह खरेदीदारानेही आपली एंट्री मारली आहे. येथे लातूर, उदगीर सारख्या मार्केट यार्डा पेक्षा पन्नास ते शंभर रूपये जादा दराने शेतीमालाची खरेदी विक्री होत आहे.
   परिणामी देवणी कृषी उत्पन्न
बाजार समीतीचा बोलबाला वाढत आहे. व तालुक्यासह सिमावर्ती भागातील शेतकरी आपला शेतीमाल देवणी मार्केट येथे आणण्याचा ओढा वाढला असून येथे खरेदीदारही वाढत आहेत.
   याचे योग्य नियोजन करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी सदिच्छा भेट घेऊन संचालक मंडळास मार्गदर्शन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी च्या वतीने त्यांचा  सत्कार करण्यात आला. 
  यावेळी सभापती सदाशिव रामचंद्रराव पाटील तळेगावकर, उपसभापती दिलीप मजगे, संचालक विलास कदम, संगप्पा चरपले, बसवराज पाटील, मोहनराव बालूरे बालाजी बिरादार, राजकुमार बिरादार भोसले सुकुमारबाई नामदेवराव, कमलबाई नागनाथ रामासने, शिवाजी पडीले, श्रीधर पाटील, सोपान शिरसे, उमाकांत बर्गे, संदीपान पेठे, शिवानंद मिर्झापुरे, मनोज लांडगे, अमीर शेख, व अटल धनूरे आदीसह व्यापारी मल्लिकार्जुन डोंगरे, राजकुमार मुर्गे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने