दिशा प्रतिष्ठानचे आरोग्य तपासणी शिबीर येल्लोरी येथे संपन्न

 दिशा प्रतिष्ठानचे आरोग्य तपासणी  शिबीर येल्लोरी येथे संपन्न

औसा-तालुक्यातील येल्लोरी येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी लातूर येथील दिशा प्रतिष्ठानचे आरोग्य तपासणी शिबिर येलोरी या गावांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिरामध्ये 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना त्यांच्या आजारानुसार मोफत औषध उपचार वाटप करण्यात आले नुकतेच सहकार महर्षी माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब सोनचिंचोली येथे दिपवाली निमित्त आले होते. तेव्हा त्यांच्या समवेत दिशा प्रतिष्ठानचे विश्वस्त अभिजीत भैया देशमुख हे आलेले होते, तेव्हा येलोरी येथील काही ग्रामस्थांनी सोनचिंचोली येथे प्रत्येक महिन्याला येत असलेला दिशा प्रतिष्ठानचा फिरता दवाखाना आमच्या येल्लोरी गावात ही येणे गरजेचे आहे ,अशी मागणी त्यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन दिशा प्रतिष्ठानचे मुख्य कार्यवाह श्री अभिजीत भैया देशमुख यांनी तात्काळ कारवाही करून येलोरी ग्रामस्थांच्या आरोग्याची प्रत्येक महिन्याला येऊन तपासणी करून मोफत औषध उपचार करण्याचे अभिवचन दिले होते. त्याची पूर्तता काल करण्यात आली या फिरत्या दवाखान्यामध्ये डॉक्टर सखुताई सूर्यवंशी, तृप्ती सोनकांबळे ,सुनील चौधरी इत्यादी सहकाऱ्यांनी गावातील शंभर रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले याबद्दल येल्लोरी गावचे सरपंच धोंडीराम लखादिवे उपसरपंच हिराकांत येरटे ,श्रीशैल येरटे मुन्ना बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते औंढेश्वर महाराज व त्यांच्या टीमने सर्व डॉक्टर मंडळीचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व प्रत्येक महिन्यात येऊन आपण अशीच सेवा आम्हाला द्यावी अशी विनंती दिशा प्रतिष्ठान कडे केली या नावीन्य उपक्रमाबद्दल दिशा प्रतिष्ठानचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले .

Post a Comment

أحدث أقدم