शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा समारोप

 शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा समारोप

  लातूर - रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा समारोप  करण्यात आला.
अध्यक्षस्थानी स्कूलचे प्राचार्य एल. टी. पुरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्रा. निशिकांत सदाफुले, शारदा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डी. एम. घारगे, मुख्य समन्वयिका अनघा पाटील उपस्थित होते.
प्रारंभी दीप प्रज्ज्वलन करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य घारगे यांनी, खेळामुळे गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांत बौध्दिक क्षमता, निर्णयक्षमता, शिस्त, सहकार्याची भावना निर्माण होते. या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो, असे त्यांनी सांगितले. प्रा. सदाफुले यांनी ‘मानवाच्या आयुष्यातील खेळाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. क्रीडा महोत्सवात क्रीडाशिक्षक बालकिशन देवडे, विजय जाधव व प्रिया बनसोड यांनी पंच म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांनी सर्व खेळांमध्ये सहभागी होत क्रीडा कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यात शाळेतील शिक्षकांच्याही स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. सुवर्ण पदक, सन्मानपत्र देऊन विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख दर्शना देशमुख यांनी केले. यावेळी समन्वयक रोहित जाधव, समन्वयिका अश्‍विनी पवार, रेणुका समुद्रे, शिक्षक समरजीत ढगे, लिंबराज गायकवाड, किरण क्षीरसागर, शिक्षिका साधना भेटे, रोहिणी कदम, उषा गुडदे, खमरुनिसा शेख, ऐश्‍वर्या बागल, प्रियल गोखले, अनिता रायमल, वैष्णवी मुंडे, सुरेखा जटाळ, गीतांजली गिरी, वर्षा कांबळे, अफरीन दामटे, शीतल नडगिरे, अश्‍विनी सुनापे, मीरा जाधव, मीनाक्षी सूर्यवंशी, लिपिक दीपक काकडे, पालक वर्ग, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने