गायक प्रा. उमेश मोहिते व प्रा.सुनिता मोहिते यांना संगीतरत्न पुरस्कार प्रदान

गायक प्रा. उमेश मोहिते व प्रा.सुनिता मोहिते यांना संगीतरत्न पुरस्कार प्रदान
मुरूम (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयातील साई छाया प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव आणि दिपावली पहाटेच्या निमित्ताने रोजी लातूर येथील आदर्श कॉलनीतील एज्युक्रेस्ट वर्ल्ड स्कूलमध्ये सुरेल संगीतमय दिपावली स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संगीत क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल सुप्रसिद्ध गायक प्रा. उमेश मोहिते व सिने पार्श्वगायिका प्रा. सुनीता मोहिते या पती-पत्नीला संगीतरत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्य साखर संघ, मुंबईचे संचालक आबासाहेब पाटील, बेलकुंड येथील संत शिरोमणि मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुलगे, प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री बरमदे आदींच्या हस्ते शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विशेष प्रस्तुती हरहुन्नरी एज्युक्रेस्टचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध शास्त्रीय, सुगम गायन सादरीकरण करताना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मोहिते पती-पत्नीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक व विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने