कव्हेकर पाटील हे राजकारणातील संत आहेत- ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज

  कव्हेकर पाटील हे राजकारणातील संत आहेत- ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज

लातूर -कुठल्याही क्षेत्रात तुम्ही कार्य करीत रहा त्या प्रत्येक कार्यात भारतीय अध्यात्माचे विचार घेऊन कार्य केल्यास त्यातून निर्माण होणारे स्वरूप हे मानव कल्यणाचेच असणार आहे. गेली. 20 वर्ष मी या परिसरात कार्य करीत आहे. यामधून मला शिवाजीराव पाटील कव्हेकरांचा संपर्क आला त्यांच्या कार्याला मी जवळून पाहिले आहे. ते राजकारणात असून ते राजकारणातील संत आहेत असे प्रतिपादन राधाकृष्ण मंदिर गातेगावचे संस्थापक ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज यांनी केले.
यावेळी ते साईसेवक प्रतिष्ठानच्यावतीने लातूर ते शिर्डी पदयात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, शिवसेनेचे मा.जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, मा.नगरसेवक रविशंकर जाधव, साईसेवक प्रतिष्ठानचे श्री.दिनकर मुळे, फुलचंद कांबळवाड, जितेंद्र गुळवे, उदय पाटील, हणमंत सारगे, मिलींद आदमाने, प्रकाश सोनवणे, लक्ष्मण सूर्यवंशी, धिरज भैरूमे, अनंत बोयणे, गोविंद शेळके, नेताजी मस्के, गोविंद सोदले, श्रीरंग सारगे, अमोल कवरे, विकी सारगे, बद्रूके, लोकरे, दुनगावे आदींची उपस्थिती होती. यावेळी ह.भ.प.विद्यानंदसागर महाराज यांनी शिर्डी येथे जाणार्‍या साईसेवक प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने