बिरोबा देवस्थान उमरगा येथे धनगर समाज आरक्षण मेळावा संपन्न

 बिरोबा देवस्थान उमरगा येथे धनगर समाज आरक्षण मेळावा संपन्न

WhatsApp Image 2023-11-15 at 10.51.30 AM(2).jpegउमरगा : दि. 14 नोव्हेंबर  2023 मंगळवार रोजी सायंकाळी 7.00  वा. बिरोबा मंदिरच्या प्रांगणात भव्य आणि दिव्य मेळावा अतिशय उत्साहांमध्ये संपन्न झाला. स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव संपूर्ण झाला. तरी न्याय, हक्कासाठी धनगर समाजाचे झगडणे सुरूच आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाज हा आदिवासी एस.टी. मध्ये समाविष्ट केलेले आहे आणि हे प्रखर सूर्यासारखे स्पष्ट सत्य असताना सत्तेत असणाऱ्या वेगवेगळ्या आलटून-पालटून सत्तेत येणाऱ्या पक्षाच्या पुढारी व नेत्यांनी धनगर समाजाच्या तीन पिढयाचे न भरून निघणारे नुकसान केले. धनगर समाजाची पिढयान-पिढी मते घेऊन सतत राज्य केले व त्यांची पिळवणूक व आडवणूक केली. अशा लोकांच्या विकृतीबद्दल अनेकांनी अनुभव कथन केले. याविषयी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. गुंडेराव बनसोडे, श्री. शिवाजी गावडे, ॲड. लक्ष्मण शिंदे, श्री. संभाजी बेकरे, श्री. चंद्रकांत बनसोडे, श्री. बलु धनगर मुरुड, श्री. विठ्ठल शेवाळे, श्री. रामकृष्ण बैले, श्री राम देवदास केळे यांनी अतिशय पोट तिडकिने विचार मांडून प्रबोधन केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक राज्यातून लाखो धनगर समाज जनसमुदाय प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. धनगर समाजाच्या टाळ्याच्या कडकडाट शब्दा-शब्दातून हृदय पिळवटून टाकणारे शब्द-निशब्द एक नव्या क्रांतीची दिशादर्शक मेळावा ठरला. जो पक्ष एस.टी. जातीचे धनगर बांधवांना सर्टिफिकेट देईल त्यालाच मतदान करायचे. आता कोणाच्या कसल्याच आश्वासनाला फसायचे नाही किंवा बळी पडायचे नाही असा सर्वांचाच एकच सुर होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सिध्देश्वर काळे, श्री. राजेंद्र गावडे, श्री. जालिंदर सोनटक्के, श्री. अशोक बनसोडे, श्री. गुलाब फडताळे, श्री. व्यंकट टाकले, श्री. गावंडेबुवा मल्हारी इतरांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार श्री. बलू धनगर यांनी मांडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने