फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली पायी दिंडी स्थगित

फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली पायी दिंडी स्थगित

औसा - तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे मोळी पूजनासाठी आयोजित कार्यक्रमास  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येण्याचे अचानक रद्द केल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी घोषित केलेली पायी दिंडी स्थगित केल्याची माहिती शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते श्री राजीव कसबे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे.
आज औसा येथील शासकीय विश्राम गृहात शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.
गेल्या दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी लातूर जिल्ह्यातून सोयाबीनला 6000 रू प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे म्हणून संपूर्ण मराठवाडा भर पायी दिंडी काढून आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास दिला होता. आता दहा वर्ष केंद्रात आणि राज्यात सुद्धा फडणवीस यांच्या पक्षाचेच सरकार आहे मग त्यावेळी काढलेल्या पायी दिंडीतील अनाभका आणि शपथा कुठे गायब झाल्या आहेत. त्याचा त्यांना विसर पडला असेल पण इथल्या शेतकऱ्यांना अद्याप ही विसर पडलेला नाही हे दाखवून देण्यासाठी ही पायी दिंडी 24आणि 25 नोव्हेंबर या कालावधीत मातोळा येथील खंडोबा दर्शनाने व किल्लारी येथील निळोबाच्या आशिर्वादाने काढण्यात येणार होती मात्र श्री फडणवीस यांचा औसा दौराच अचानक रद्द झाल्याने ही दिंडी स्थगित करावी लागली आहे. परंतु आगामी काळात फडणवीस यांच्या दौऱ्यात त्यांनी केलेल्या खोट्या दिंडीची आठवण करून देण्यासाठी व सोयाबीनला कमीत कमी 9000 ₹ प्रति क्विंटल दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने खरी दिंडी काढली जाईल असं ही पत्रकात श्री राजीव कसबे यांनी नमूद केले आहे.आज घडीला यांत्रिकीकरणासह वाढता उत्पादन खर्च, घटलेलं उत्पादन, मजुरी आणि त्यावर खरीप हंगामापर्यंत मशागतीचा सर्व खर्च जर पाहिला तर सात ते आठ हजाराच्या घरात प्रति क्विंटल जातो .सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे. केवळ निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन आम्हीच तुमचे कसे उद्धारकर्ते  आहोत ते पटवून देण्यासाठी सर्व काय करायचे अन एकदा सत्तेत आले की "अपना काम बनता भाड में जाय जनता "असं दुटप्पी वागायची आता रीतच झाली आहे.
शेतकरी आता संघटित झालेला आहे तो आता खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही तेच रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यात आपल्या एल्गार मोर्च्यात लाखोंच्या गर्दीने दाखवून दिलेले आहे. शेवटी पत्रकात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालय ताब्यात घेऊ अशी सिंह गर्जना केलेली आहे त्यासाठी सत्तार पटेल, राजेंद्र मोरे,अरुण दादा कुलकर्णी हे जिल्हाभर जागृती करीत असून असंख्य शेतकरी बांधव मुंबईला जाणार असल्याची माहिती सुद्धा पत्रकात प्रसिद्ध केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने