51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी माध्यमिक विद्यालय तृतीय

51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी माध्यमिक विद्यालय तृतीय 
लातूर :  शिक्षण विभाग पंचायत समिती लातूर द्वारा आयोजित 51 वे  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार दिनांक 12  डिसेंबर रोजी लातूर येथील यशवंत विद्यालयात संपन्न झाले. शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर च्या वतीने यशवंत विद्यालय, लातूर या शाळेत दि.11 व 12 डिसेंबर 2023  रोजी 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यामध्ये  साने गुरुजी गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या  वतीने "अल्कोहोल सुरक्षा वाहन" या विषयावर प्रयोग सादर करण्यात आला होता. या प्रयोगामध्ये गुडले आदित्य व आगवाने आदित्य या विद्यार्थ्यांनी व  धोत्रे वैभव व कावळे स्मिता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग सादर करत  तृतीय क्रमांक मिळविला. 
एकाने विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपासाठी डायटच्या  प्राचार्या गिरी मॅडम, गटशिक्षणाधिकारी पंचगले साहेब, विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजक रवींद्र पाटील , परिक्षक  व आदीच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव कालिदासजी माने, प्रशासकीय अधिकारी गोविंदराव माने, शाळेचे मुख्याध्यापक इस्माईल शेख, शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने