रामनाथ विद्यालयात सिद्धेश्वर बँक व आलमला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
आलमला-श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला येथे दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी वार शनिवार विद्यालयाच्या प्रांगणात रामनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिवाजी आंबुलगे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन श्री शिवकुमार किशनराव पाटील रायवाडीकर व्हा. चेअरमन अँड उमेश शिवाप्पा पाटील यांची बँकेवर निवड झाली म्हणून व आलमला ग्रामपंचायत मध्ये परवाच झालेल्या निवडणुकीत श्री सरपंच म्हणून श्री विकास महादेव वाघमारे उपसरपंच इरफान झहीरुद्दीन मुलानी व ग्रामपंचायतीचे सदस्य श्री शिवराम शिवरुद्र पाटील, सौ कीर्ती वीरनाथ निलंगेकर सौ प्रेमला जयशंकर कदम, सौ रत्नमाला लिंबराज लोणारे सौ हरीबाई मधुकर चित्ते ,सौ कलिमुनबी हसमुद्दीन सय्यद, अमर प्रभाकर लांडगे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामनाथ शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांनी केले व रामनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. एस एस पाटील उर्फ बाबा यांनी ही रामनाथ शिक्षण संस्था आणि सिद्धेश्वर सहकारी बँक स्थापनेपासून शेवटच्या श्वासापर्यंत या दोन्ही संस्था विकसित करण्यासाठी प्रयत्न केले म्हणूनच त्यांचे चिरंजीव अँड उमेश पाटील यांना बँकेने व्हाईस चेअरमन पदाची संधी दिली त्याबद्दल सर्व सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या चेअरमन व कार्यकारी मंडळाचे आभार व्यक्त केले व या दोघांनाही पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सत्काराला उत्तर देताना उपसरपंच श्री इरफान मुलानी व सदस्य अमर लांडगे यांनी ही रामनाथ विद्यालयाच्या बद्दल गौरव उदगार काढून आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ,असे गौरवोद्गार काढले सत्काराला उत्तर देताना अँड उमेश पाटील यांनी ग्रामस्थांचे संस्थेचे व सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त करून आपणही बाबाचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही संस्थेमध्ये पारदर्शकपणे काम करण्याचे अभिवचन दिले. तसेच सत्कारमूर्ती श्री शिवकुमार पाटील यांनी सत्कार प्रसंगी संस्थेचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव आंबुलगे यांनी सिद्धेश्वर सहकारी बँकेमध्ये बँक व्यवस्था केलेल्या कार्याविषयी व नूतन सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा सत्कार स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले व ग्रामपंचायत आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी सी पाटील यांनी केले व आभार श्री प्रा. मुळे पी के यांनी मांडले. या कार्यक्रमास रामनाथ शिक्षण संस्थेचे संचालक मन्मथअप्पा धाराशिवे, शिवसाब हुरदळे , विरनाथ हुरदळे ,शिवशंकर धाराशिवे, कैलास कापसे, शिवदास हुरदळे ,भगवान हुरदळे,प्राचार्य सौ अनिता पाटील अँड संगमेश्वर पाटील सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा