जिपप्राशाळेत सखी सावित्री समितीची बैठक संपन्न

जिपप्राशाळेत सखी सावित्री समितीची बैठक संपन्न
मुरुम (प्रतिनिधी) : बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होण्यासाठी सखी सावित्री समितीची सातवी बैठक सोमवारी (ता. १८) रोजी जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळेत पार पडली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका विजयश्री गोडबोले होत्या. प्रारंभी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सुवर्णा पाटील यांनी ' आयुर्वेद चिकित्सा आणि आरोग्य ' या विषयावर काही महत्त्वाचे नियम, आहार-विहार, योगा-प्राणायाम, ध्यानधारणा आदी घटकांवर प्रकाश टाकला. सखी सावित्री समितीचे समुपदेशक सदस्या धम्ममित्र सुनिता कांबळे यांनी ' आदर्श जीवन शैली ' या विषयावर मार्गदर्शन करताना स्त्रियांनी स्वत: च्या कुटुंबात सकस व समतोल आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुकेशनी कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ' पालकांची जबाबदारी आणि कर्तव्ये ' या विषयी माहिती दिली. रुपचंद ख्याडे यांनी विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी प्रत्येकांने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. रेणुका कुलकर्णी यांनी ताणतणाव व्यवस्थापन करण्यासाठी मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी शासनाच्या सर्व योजना यशस्वी राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी अंगणवाडी सेविका स्नेहल गोडबोले, पत्रकार अजिंक्य मुरूमकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगल कचले, सुनिता मिरगाळे, शिवाजी गायकवाड, अमर कांबळे आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपचंद ख्याडे व आभार प्रमिला तुपेरे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने