जेएसपीएम शैक्षणिक संकुल लातूरच्या गुणवत्तावाढीसाठी पालकांचे योगदान मोलाचे-निळकंठराव पवार
लातूर-जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय आणि श्री.स्वामी विवेकानंद विद्यालयातील पालक शिक्षक संघ, माता-बालक-पालक समिती , महिला अत्याचार निवारण समिती, सखी सावित्री समिती आदी समित्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या सहकार्याबरोबरच पालकाचेंही योगदान महत्त्वपूर्ण असल्यामुळे जेएसपीएम संस्थेचा नावलौकिक राज्यामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे खर्या अर्थाने जेएसपीएम शैक्षणिक संकुल लातूरच्या गुणवत्तावाढीसाठी पालकांचेही योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांनी केले.यावेळी ते जेएसपीएम संचलित विविध समिती सदस्यांच्या विशेष बैठकीत बोलत होते. यावेळी विशाखा समितीच्या सदस्या नगरसेविका सौ.रागिणीताई यादव, महिला तक्रार निवारण समिती सदस्य अॅड.किशोर कांबळे, समिती सदस्य श्रीराम सांळुके, प्राजक्ता सुवर्णकार, शिवकन्या तट, मनिषा कुलकर्णी, छाया कुंभार, अलका कुंभार, स्वरा पांढरे, सोनाली भांबरे, अलका अंकुशे, संगिता जगताप, सोनाली कदम, शितल वाडीकर, वर्षा वेदे, विद्यावर्धिनी गायकवाड, निलम कांबळे, उपमुख्याध्यापक प्रभाकर सांवत, अनिल सोमवंशी, तुकाराम येलाले, बालाजी बोकडे, पांडूरंग देशमुख, भागवत ढोक, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारूती सूर्यवंशी, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना निळकंठराव पवार म्हणाले की, जेएसपीएम संस्थेच्या एमआयडीसी शैक्षणिक संकुलात चालणार्या सर्व युनिटची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी पालक वर्गाचे नेहमीच मोठे योगदान लाभलेले आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करीत भविष्यातही सर्वांनी संस्थेच्या हितासाठी योग्य त्या सुचना आणि मार्गदर्शन करावे. याबरोबरच अध्यात्म, विज्ञान आणि व्यावसायिकतेवर आधारित तेजस्वी तरूण घडविण्यासाठी कार्य करणारे लोकनेते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या कार्यामध्ये नेहमी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा