पं. गिरीष गोसावी यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध
लातूर/ प्रतिनिधी-शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे तेरावे वंशज गिरीष गोसावी यांनी जय जय रामकृष्ण हरी, जन नोहे आवघा जनार्दन, माझे माहेर पंढरी अशा अनेक संत रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
लातूर तालुक्यातील चिखुर्दा येथील स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उ्घाटन बाळासाहेब कदम यांनी केले.अध्यक्ष अड. मुक्तेश्वर वागदरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. शिव रूद्र स्वामी, व्यंकटराव
पनाळे, शंकर देशमुख, दत्ता घाडगे, रणवीर जाधव, युवराज हालकुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तबल्याची साथ शंकर जगताप यांनी केली, हार्मोनियम साथ जनार्दन गुडे यांनी तर कैवल्य पांचाळ यांनी पखवाज साथसंगत केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बसवेश्वर गजभारकर, शिवानंद बुलबुले, शरणाप्पा बिडवे, अण्णासाहेब पाटील, मदन लोमटे, दिलीप पाटील, नरसिंग राजे, गजेंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा