मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाबाबत तहसील कार्यालयात मदत कक्ष स्थापन
लातूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी, संदेश आणि प्रगणक व पर्यवेक्षक यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी स्वीकारण्यासाठी लातूर तहसील कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे आहे. 02382-242962 हा मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आहे. तहसीलदार तथा नोडल अधिकारी सौदागर तांदळे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
मदत कक्षासाठी नियुक्त पथकाचे प्रमुख म्हणून भीमाशंकर बेरूळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत राजेंद्रकुमार गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. 8275599333), दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत श्री. पोलकर (भ्रमणध्वनी क्र. 7972277485), 26 जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत चंद्रकांत म्हेत्रे (भ्रमणध्वनी क्र. 9422911401), दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत निवृत्ती जाधव (भ्रमणध्वनी क्र. 9423736848), 27 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 2 पर्यंत दत्तात्रय गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. 9730288186), दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत चंद्रकांत म्हेत्रे (भ्रमणध्वनी क्र. 9422911401), 28 जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत निवृत्ती जाधव (भ्रमणध्वनी क्र. 9423736848), दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत दत्तात्रय गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. 9730288186), 29 जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत श्री. पोलकर (भ्रमणध्वनी क्र. 7972277485), दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत राजेंद्रकुमार गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. 8275599333), 30 जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत निलेश सोमाणी (भ्रमणध्वनी क्र. 7720897777), दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत अण्णाराव वाघमारे (भ्रमणध्वनी क्र. 7875090936), 31 जानेवारी रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बी. आर. करमले (भ्रमणध्वनी क्र. 9421745445), दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत राजू येवले (भ्रमणध्वनी क्र. 8275233777) यांची मदत कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा