राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मुंबईत खेळाडू चमकले

 राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मुंबईत खेळाडू चमकले
 आलमला/प्रतिनिधी:- दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये आलमला येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्र, आसाम,मणिपूर,त्रिपुरा, नागालँड उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश अशा विविध ठिकाणावरून कराटे प्रशिक्षणाने व मुलांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत 2024 मधील प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे आपल्या लातूर नगरीला मिळाले आहे.यात महाराष्ट्रातून संघ ट्रॉफी लातूर मधून अलमल्याला प्राप्त झाली आहे.या यशात सिंहाचा वाटा आपल्या आलमला येथील रामनाथ विद्यालय, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल, केंद्रीय प्राथमिक शाळा अलमला या मुलांचा सहभाग आहे.या यशस्वी खेळाडूंचा व त्यांना घडवणाऱ्या श्री चंद्रकांत सारगे प्रशिक्षक यांचाही यावेळी  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील यांच्या हस्ते रामनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य सत्कार करण्यात आला.यात प्रशांत कुंभार ,सौरभ बोकडे, वेदांत खंगले ,यशराज कदम, चैतन्य कदम,कु.भूमी अलमले ,समर्थ कुंभार सोहम स्वामी ,कु.अंकिता उपाध्ये, विश्वास पाटील यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे, तर श्रवण निलंगेकर, अश्विन बेरुळे, बळीराम लोणारे, सुजल कदम, इस्तियाक मुलानी, अक्षदा उपाध्ये, विश्वजीत लोणारे ,सोहम बेरुळे, गौरव नौबदे, सोहम कुंभार, श्रीशैल्य लोणारे,कु.आरती नौबदे, अनिकेत माने,कु.मोहिनीअलमले, या विद्यार्थ्यांना सिल्वर पदक प्राप्त झाले आहे.या सर्व खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक पी. .सी.पाटील,सर्व शिक्षक बंधू भगिनी व  यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन भास्कर सूर्यवंशी यांनी मांडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने