राज्यात बाजार समितीचा बंद यशस्वी राज्य बाजार समिती संघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद-राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी
लातूर- राज्याच्या पणन कायद्यातील बदलाविरोधात राज्यातील सर्व बाजार समित्या सोमवारी बंद राहिल्या. यात लातूरसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व उपबाजार बंद राहिल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते आजच्या बाजार समिती बंद ला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विधी नियम अधिनियम 1963 मध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत प्रस्तावित विधेयकातील सुधारणा या शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापाडी व इतर बाजार घटक तसेच बाजार समितीचे अस्तित्व व मूल्यांचे महत्त्व संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते उपरोक्त बाबी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे या राज्यस्तरीय संस्थेचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली,पुणे येथे बैठक संपन्न झाली त्यानुसार हा बंद पुकारला होता त्या बैठकीला राज्यातील सभापती व सचिव उपस्थित होते.
संबंधित बैठकीद्वारे सदर विधेयकाला विरोध दर्शविण्याकरिता दिनांक 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले .
कायद्याला विरोध-संतोष सोमवंशी यांची माहिती
सरकारने याबाबत निर्णय घेतला, प्रस्तावित सुधारणाच्या अनुषंगाने बाजार समित्या उध्वस्त होणार असून बेरोजगारी वाढणार आहे. सहकारी तत्वावर आधारित व्यवस्था मोडीत काढून सरकारी करणाच घाट घातला जात आहे. अडते बाजारातून काढणे, मोठ्या बाजार समित्या आहेत ज्याचे उत्पन्न दहा कोटीचे पुढे आहे 30 टक्के माल बाहेरील राज्यातून येणार आहे तेथे प्रशासकीय मंडळ नेमणे त्याचे सभापती पणनमंत्री शासनाचा अधिकारी उपसभापती वगैरेची नेमणूक करणे अश्या सुधारणा सुचविलेल्या आहेत. तसेच बाजार आवार सिमांकीत करून बाजार समित्यांचे उत्पन्न कमी करण्याचा प्रयत्न आहे. बाजार समित्यांनी जो स्व निधीतून व कर्जे काढून पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या ओस पडतील व बाजार समितीच्या आवारातील, कामगार देशोधडीला लागतील. बाजार समितीच्या कर्मचा- यावर आर्थिक परिणाम होऊन त्यांचे संसार उघड्यावर येतील. म्हणून प्रस्तावित सुधारणा करू नये याकरिता हरकती शासनाला सादर केलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 26.2.2024 चा लाक्षणिक संप पुकारण्यात आला व या दरम्यान कोणतीही अनुचित घटना न होता राज्यातील सर्व बाजार समित्यांनी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या व संप 100 टक्के यशस्वी झाला. अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी दिली.
إرسال تعليق