भाजपा किसान मोर्चातर्फे 12 फेब्रूवारी रोजी लातूरात शेतकरी मेळावा
लातूर -भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांच्या आदेशानुसार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे ऑनलाईन एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून लातूर शहरातील स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात लातूर शहर व परिसरातील शेतकर्यांशी 12 फेब्रूवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वा. व्यापक संवाद साधणार आहेत. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपा किसान मोर्चाचे गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदासराव काळे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक केंद्रे, भाजपाचे विक्रम शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, तसेच भाजपा किसान मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष दगडोजीराव साळुंके, हे उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपाचे लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, भाजपा मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, सेवा निवृत्त कर्मचारी, वकील, डॉक्टर, माजी सैनिक, ग्रामपंचायतीचे पंच मंडळी व पदाधिकारी यांची उपस्थित राहणार आहे.या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र शासनाच्यावतीने गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी हितासाठी आणलेल्या योजना, त्याची झालेली अंमलबजावणी व शेतकर्यांना मिळालेल्या विविध योजनेचा लाभ यांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच येणार्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून शेतकर्यांच्या काय अपेक्षा ओहत. याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला लातूर शहर व परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चा लातूर जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने करण्यात आलेले आहे.
إرسال تعليق