महासंस्कृती महोत्सवात सादरीकरणासाठी स्थानिक कलावंतांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

महासंस्कृती महोत्सवात सादरीकरणासाठी स्थानिक कलावंतांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन


लातूर : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, लातूर जिल्हा प्रशासनामार्फत भव्य महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने 100 व्या नाट्य संमेलनाचे लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात स्थानिक निवडक कलावंतांना सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. यासाठी कलावंतांनी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या मध्यामिक शिक्षण विभागात नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

दयानंद महाविद्यालय मैदान, दयानंद सभागृह आणि मार्केट यार्ड येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्य संमेलनातील कार्यक्रम होणार आहेत. महासंस्कृती महोत्सवामध्ये 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमात सादरीकरणात स्थानिक कलावंतांना निवडक सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कलावंतांचे सादरीकरण घेवून निवड करेल.
सादरीकरणासाठी मर्यादित वेळ राहील. कलाकारांच्या सादरीकरणातील गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. याबाबत समितीचा निर्णय अंतिम राहील. तरी लातूर जिल्ह्यातील कलावंतांनी जिल्हा परिषदेच्या माध्यामिक शिक्षण विभागात अथवा माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी (भ्रमणध्वनी क्र. 9422725919) किंवा प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे (भ्रमणध्वनी क्र. 8275238788) यांच्याकडे नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم