कृषी मोहत्सवात केला शेतकऱ्यांनी गनिमी काव्याने सरकारचा निषेध

कृषी मोहत्सवात केला शेतकऱ्यांनी गनिमी काव्याने सरकारचा निषेध
लातूर :गेल्या दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात पायी दिंडी काढत सोयाबीनला 6000 रू भाव मागितला होता त्याची आठवण करून देण्यासाठी लातुरात आज कृषी मोहात्सवात गनिमी कवा करीत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.
लातूर येथे कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून शेतकरी उपस्थित राहतील अशी संयोजकांना अपेक्षा होती. भव्य सभामंडप, आखीव रेखीव स्टॉल्स, vip बैठक व्यवस्था, पोलीसचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पालकमंत्री, खात्याचे मंत्री, जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदार, जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ अपेक्षित होता मात्र ऐन वेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि जिल्हाधिकारी यांनी उदघाटन केले.
शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी गनिमी कावा करीत असंख्य कार्यकर्ते घेऊन गांधींगिरी करीत अचानक सभामंडपासमोर सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण अश्या आशयाचे मजकूर असलेले फलकाचे बॅनर आपल्या अंगात घालून सर्वांचे लक्ष वेधून घेत अनोखे मूक आंदोलन केले त्यावेळी एकच गदारोळ झाला कुणाला नेमका काय प्रकार आहे हेच  समजेनासे झाले व व्यासपीठासमोरून शेतकरी कार्यकर्ते अत्यंत शिस्तीत शांतपणे मूक आंदोलन करीत बाहेर निघून जाऊ लागली त्यावेळी आंदोलकांच्या अंगावरील फलकावर सोयाबीनच्या भावाविषयी कुणी तरी बोलेल का? या कृषी मोहत्सवात सरकारचे गोडवे गाताना पीकविमा हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असं कुण्या नेत्याला, मंत्र्याला वाटेल का? दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला 6000 रू भाव मागणारे राज्यकर्ते आज गप्पच का? अश्या आशयाचे मजकूर आणि शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा श्री रविकांत तुपकर, राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांच्या फोटोनी लक्ष वेधून घेतले होते.
शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी या मोहत्सवावर सडकून टीका करताना सरकारने चालवलेली ही नौटंकी असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. त्यामुळेच आज शेतकऱ्यांनी या मोहत्सवाकडे पूर्णपणे पाठ फ़िरवली आहे असं म्हटलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली जाहिरात करणे एवढंच सरकारला अपेक्षित असल्याचा घणाघाती आरोप आंदोलकांनी केला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत शेतकरी शेतमजूर आणि निराधार बांधवांना एकत्र करीत राज्यभर महाएल्गार मोर्चा, मंत्रालयाचा ताबा आंदोलन, नागपूर अधिवेशन वरील हल्लाबोल औसा येथील विराट महाआक्रोश मोर्चा, अनेक ठिकाणी रेल रोको आंदोलन करीत सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याचे प्रयत्न केले परंतु सरकार मस्तीत आहे, सत्तेचा माज आलेला आहे त्यामुळेच आपल्या मागण्या विषयी सरकार गांभीर्य घेत नाही परंतु आम्हांला लोकशाहीत संविधानाने मत आणि निवडणूक ही अत्यंत प्रभावी अस्त्र आणि शस्त्र आमच्या हाती दिलेली आहेत त्याचा उपयोग जनता निश्चितपणे करेल आणि सरकारला त्यांची जागा आगामी निवडणुकीत दाखवेल असा इशारा या कृषी मोहत्सवात आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनात राजेंद्र मोरे राजीव कसबे, शाम जाधव, बब्रुवान सूर्यवंशी, हनीफ शेख, इमाम सय्यद, अंगद पवार, दत्ता किणीकर, दत्ता गायकवाड अमोल सूर्यवंशी, अप्पराव हुडे, हणमंत भडंगे, चंदर देवकर, माणिक कोळी, हणमंत सुरवसे, मुक्ताराम काळे व्यंकट चलवाड, रणजित पारवे, शरद रामशेटे, नामदेव माने, सावन गवळी, सुरेश सुयवंशी अशी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने