महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
निलंगा (रविराज मोरे-प्रतिनिधी)-माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथे दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या दिवशी माजी पालक मंत्री तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते रक्त दान शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर व प्राचार्य डॉ.भागवत पौळ, प्राचार्य डॉ. एस एस पाटील उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात माजी पालक मंत्री तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी रक्त दान केले,तसेंच माझी विध्यार्थी व नगरसेवक सुधीर लखनगावे, प्रा. मूळडकर सर, सौ. मोरे मॅडम, प्रा.सलघंटे सर व इतर 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले व या शिबिरात, महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीपराव धुमाळ सर, प्राचार्य डॉ. कोलपूके सर, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड सर, मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ सर यांनी भेट दिली.याप्रसंगी निलंगा शहर व ग्रामीण परिसरातील नागरिक, महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा व महाराष्ट्र पॉली डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यासाठी प्राचार्य डॉ. भागवत पौळ, प्राचार्य डॉ. एस एस पाटील, प्रा. विलास कारभारी, प्रा. इरशाद शेख, प्रा. विनोद उसनाळे, डॉ.अमोल घोडके, डॉ. सी.व्ही.पांचाळ सर व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा