लातूर/ प्रतिनिधी- जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाच्या औचित्य साधून एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तील दिव्यांग विद्यार्थ्यासोबत चित्रकला, डान्स, खेळ, खाऊ देऊन हा विशेष दिन साजरा केला. जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाचे या वर्षीचे ब्रीदवाक्य "एंड ऑफ स्टर्योटाईप "होते. फिजिओथेरपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रकल्प व दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन व चर्चा केली . या मुलांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीची वागणूक कशी मिळवून देता येईल हेही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या दिनानिमित्त सविस्तर असे मार्गदर्शन केले या दिव्यांग मुलांना महाविद्यालयातर्फे बॅग खेळाचे वस्तू भेट देण्यात आले.
यावेळी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,यांच्या सहकार्याने व प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम आणि डॉ. पल्लवी तायडे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी झाला तर फिजिओथेरपी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा