औसा प्रतिनिधी- शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये, असलेला सहभाग तसेच शाळेमधील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम याबद्दल शाळेचे अभिनंदन केले व या शाळेचे विद्यार्थी निश्चितपणे सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये यशस्वी होतील याबाबत खात्री द वर्ल्ड स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे रामदास कोकरे यांनी व्यक्त केली व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास कोकरे, सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन, लातूर, भास्कर कोळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प, लातूर, काशिनाथ सगरे, अध्यक्ष औसा तालुका पत्रकार संघ,संदिपान जाधव, उद्योजक औसा, लीड कंपनीचे अधिकारी मिलन शेख, संस्थेच्या संचालिका प्रा. सौ.ज्योती पाटील,गणेश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये वर्षभरामध्ये शाळेमध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन,टॉपर ऑफ द क्लास, ऑलिंपियाड स्पर्धा इत्यादी स्पर्धांमधील मधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच संस्थेचे मार्गदर्शक स्वर्गीय अॅडवोकेट हनुमंतराव भोसले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरु करण्यात आलेला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर पुरस्काराने प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यास ट्रॉफी व प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले.तसेच महिला पालकांसाठी आयोजित दांडिया स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा मधील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर लीड कंपनीचे अधिकारी मा.श्री मिलन शेख यांनी "शिक्षा अवार्ड 2024" मध्ये द वर्ल्ड स्कूलने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक व पाच राज्यांच्या पश्चिम झोनमध्ये आठवा क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या हस्ते संस्था व गुणवंत शिक्षक यांना शिक्षा अवार्ड ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले, तसेच लीड कंपनी ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी भारतातील अग्रेसर संस्था असून संपूर्ण भारतामध्ये 9000 शाळांमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य करण्याचे काम करीत असून आपल्या द वर्ल्ड स्कूलने शैक्षणिक उपक्रम राबविण्यात अतिशय उत्कृष्ट कामगीरी करून महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याचे नमूद केले.
त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या विळख्यात अडकलेले पालक व विद्यार्थी यावर आधारित अत्यंत समर्पक नाटक, देशभक्तीपर गीत, चित्रपट सृष्टीतील गीते, कोळीगीत,लावणी नृत्य,गोंधळ, वासुदेव गीत,शेतकरी गीत, पंजाबी गीत यावर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थित पालकांची मनी जिंकली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव, सौ.अर्चना चव्हाण ,सौ. रेणुका साळुंखे, कु.पूजा शिंदे,सौ.रंजना दुड्डे,सौ.अश्विनी उटगे,सौ वर्षा बोळ,कु. ताजीन पटेल कु. विशाखा औटी कु. सना खान पठाण, कु. आतिया लोहारेकर,सौ.हासुबे ताई व श्री विजय हासुबे यांनी परिश्रम घेतले.मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी सर्व पाहुण्यांचे उपस्थित पालकांचे आभार व्यक्त केले .
टिप्पणी पोस्ट करा