प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे) श्री कपीलधारेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित

प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे) श्री कपीलधारेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित
 लातूर:- "निरोगी हदयासाठी हेल्दी लाईफस्त आहार विहारावर योग्य नियंत्रण योग- प्राणायाम छंद, मित्रांसोबत मोकळ्या हास्य-गपा असल्यास हाई अटॅक आणि हृदय रोग टाळता येऊ शकतो." असे ठाम प्रतिपादन डॉ.संजय शिवपुजे यांनी केले .लातूर येशील श्री कपीलधारेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान- मालेत 'हृदय-संवाद' (हार्ट अटॅक आणि अवेळी होणारे मृत्यू घ्यावयाची काळजी) या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना -हार्ट अटॅक ची लक्षणे काय आहेत, हृदयविकाराचा झटका का येतो ,हार्ट अटॅक आल्यानंतर काय करावे, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी किती वेळ छातीत दुखणे आवश्यक आहे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन  व्याख्याते डॉ. संजयकुमार शिवपुजे यांनी सांगितले.
             
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.राजकुमार कत्ते यांनी भुशिवले. प्रमुख पाहुणे  डॉ. संजयकुमार शिवपुजे .  यावेळी संस्थेचे सचिव राजकुमार बिडवे, सहसचिव वैजनाथ जायगे, कोषाध्यक्ष प्रा. राजेश विभूते, उपाध्यक्ष  नयन राजभाने आणि कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते
            तसेच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल श्री कपिलधारेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कपिलधारेश्वर पुरस्काराचे मानकरी   शिक्षण रत्न एस व्ही एस.एस.लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयाचे प्राचार्य   डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ),राजेश्वर डांगे ,कमलेश पाटणकर ,शैलजा पाटणकर आणि तेजस बिराजदार यांना सन्मानित करण्यात आले.
             त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,  संचालक नंदकिशोर बावगे तसेच लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह  , ज्ञानसागर विद्यालय,हासेगाव ,  लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकुमार कत्ते, सूत्रसंचालन डॉ.प्रभा वाडकर तर आभारप्रदर्शन राहुल पत्रिके यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने