प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
मुरूम (प्रतिनिधी) : येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस या दिवशी शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात शनिवारी (ता. १५) रोजी साजरा करण्यात आला. सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. यंदा नविन प्रवेश घेणाऱ्या व उपास्थित सर्व विद्यार्थ्यांचे शाळेमार्फत प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर व मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना मिठाई देवून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सच्छिदानंद अंबर, धनराज हाळळे, संगमेश्चर लामजणे, सहशिक्षक सुभाष धुमाळ, विरेंद्र लोखंडे, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे, सहशिक्षिका संगीता देशमुख, नेहा माने, शितल घोडके, सरस्वती समन, तनुजा जमादार, प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, शेळके, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, सुधाराणी शेळके सह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश उत्सव साजरा करताना विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने