स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव धुरगुडे यांचा 34 वा स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमाने संपन्न

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव धुरगुडे यांचा 34 वा स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमाने संपन्न
तुळजापूर-स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांची 1 जानेवारी रोजी ची जयंती आणि 25 जुलै रोजी चा स्मृतिदिन पुणे शहर आणि मराठवाडा परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला जातो.
       मागील पंचेवीस वर्षापासून दरवर्षी 1 जानेवारी रोजीच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठवाडास्तरीय विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच 25 जुलै रोजीच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप केले जाते.
      यावर्षी 25 जुलै 2024 रोजी, 34 व्या स्मृतिदिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येक शाळेत खालील पुस्तकांच्या अनेक प्रती देण्यात आल्या.सुभाष वारे लिखित:-  आपले भविष्य "भारतीय संविधान",गोविंद पानसरे लिखित :-  "शिवाजी कोण होता",एस एम मुश्रीफ लिखित :- "करकरेंना कोणी व का मारले", राजकुमार धुरगुडे लिखित :-  "उत्साहवर्धिनी आमची आई",कमलाकर सावंत व राजकुमार धुरगुडे लिखित :-  "निश्चयाचा महामेरू भानुदासराव जयवंतराव धुरगुडे",श्रीमंत कोकाटे लिखित :- सचित्र "छत्रपती शिवाजी महाराज",राजकुमार धुरगुडे लिखित :-  "कृषी जगत एक चिंतन","वैभवशाली मराठवाडा" विशेष अंकांच्या प्रती,राजकुमार धुरगुडे संपादित :- "कृषीभूषण" त्रमासिकांच्या प्रती,थोर स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व समाज सुधारक भानुदासराव धुरगुडे यांचा समाजकार्याचा वारसा जोपासत त्यांच्या तिसऱ्या पिढीतील उद्योजक असणारे सागर आणि सुरज राजकुमार धुरगुडे यांनी स्वतः वेगवेगळ्या शाळेत जाऊन या पुस्तकांचे वाटप केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने