अमृतेश्वर शिवाचार्य यांच्या शिवकथेने भक्तीमय वातावरण
औसा/ प्रतिनिधी-हिरेमठ संस्थान च्या 84 व्या वार्षिक महोत्सव निमित्त दिनांक 23 ते 29 जुलै 2024 या कालावधीमध्ये स्वर सम्राट अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर यांच्या संगीतमय शिव कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीमध्ये सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये स्वर सम्राट श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या संगीतमय शिव कथेने भक्तगणामध्ये उत्साह संचारला असून हिरेमठ संस्थान मध्ये शिवकथा प्रसंगी वातावरण भक्तीमय बनले आहे. संस्थांचे लिंगायत्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी 8 दशकापूर्वी आषाढ माशी वार्षिक महोत्सवाची सुरू केलेली परंपरा अविरतपणे डॉ. शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थांचे पिठाधिपती बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली आयोजित शिवकथा कार्यक्रमास औसा शहरातून हजारो महिला, पुरुष भक्तगण भक्ती भावाने सहभागी होत आहेत. दिनांक 23 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये वार्षिक महोत्सवा निमित्त महाप्रसादाच्या माध्यमातून अन्नदानाचा उपक्रमही वीरशैव समाजातील देणगीदारांच्या सहकार्याने सुरू आहे. शिव कथा कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सुरेश सुभाषप्पा मुक्ता अध्यक्ष, वीर सेवा आणि वीरशैव युवक संघटना औसा यांच्या वतीने करण्यात येते.
टिप्पणी पोस्ट करा