श्री वेताळेश्वर शिक्षण संकुल लातूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

श्री वेताळेश्वर शिक्षण संकुल लातूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
  औसा/ प्रतिनिधी-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था लातूर, संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर, कॉलेज ऑफ सायन्स व राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर ,लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर यांच्या संयुक्त  विद्यमानाने आजादी का अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहण प्रमुख पाहुणे अभय साळुंखे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रवीण बिराजदार जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस लातूर, एम के सी एल मराठवाडा विभाग प्रमुख महेश पत्रिके आणि मुकेश बीदादा तालुकाध्यक्ष औसा, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे, उपाध्यक्ष सौ जयदेवी बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, सौ माधुरी बावगे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला,प्राचार्य डॉ. विरेंद्र मेश्राम , प्राचार्य संतोष मेदगे ,उपप्राचार्या योगिता बावगे ,उप प्राचार्या क्षितिजा माळी राजशेखर चौधरी, प्राचार्य सोनहिवरे माधव उपस्थित होते.
  तसेच महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.  प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते  सन्मानचिन्ह ,रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन पारितोषिकचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील पहिले महाराष्ट्र नौलेज  कॉर्पोरेशन लिमिटेड मान्यता  प्राप्त प्रशिक्षण केंद्र लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर मध्ये उभारण्यात आले त्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला सर्व युनिटचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी ध्वजारोहण साठी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने