श्रीशैल उटगे यांच्या उपक्रम संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर संपन्न

 श्रीशैल उटगे यांच्या उपक्रम संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर संपन्न 
किल्लारी -लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या संकल्पनेतून किल्लारी येथे रविवारी ( ता. १८ ) मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. 
शिबिराचे  उद्घाटन सरपंच सुलक्षणा बाबळसुरे आणि सोसायटीचे चेअरमन किरण बाबळसुरे यांच्या हस्ते झाले.  शिवदर्शन दादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद बाबळसुरे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश मिरगे, व्हाईस चेअरमन रमेश बालकुंदे, संचालक केशवराव भोसले, हारून आत्तार,  सचिव वाघम्बर कांबळे, तळणीचे चेअरमन देविदास पवार, सत्यम श्रीशैल्य उटगे, बालरोगतज्ञ  डॉ. लकडे, डॉ. महेश शिंदे, डॉ. संभाजी दुबे, डॉ.  रामराजे गायकवाड आदींची  प्रमुख उपस्थिती होती.  
शिबिर समारोप प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उठगे,  किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली गुंजोटे, बाळासाहेब सांगवेसह कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व रोगनिदान शिबिरात एकूण ३६५ शिबिराचा  लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण बाबळसुरे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश भोसले यांनी केले. 
यावेळी माधव बिराजदार, शाहूराज भोसले, संग्राम बिराजदार, अमित बाबळसुरे, बसवराज गावकरे, संजय बाबळसुरे, गोपाळ बाबळसुरे, जितेंद्र शिंदे, अजित बाबळसुरे, संजय बाबळसुरे, किशोर बाबळसुरेसह 
स्नेहस्री वेल्फेअर फाउंडेशन, एस. ओ. एस. मल्टीस्टेट लातूर व विविध कार्यकारी सेवा सोसायटी किल्लारीचे पदाधिकारी, किल्लारी, तळणी, नदी हत्तरगा, कारला, कुमठा, सिरसल, लामजना, खरोसा, येळवट आदी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने