रामनाथमधील जगन्नाथ अंबुलगे यांना निरोप

रामनाथमधील जगन्नाथ अंबुलगे यांना निरोप
आलमला : श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय आलमला येथे दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी विद्यालयाच्या प्रांगणात श्री जगन्नाथ संगनाथ अंबुलगे (सेवक) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड उमाशंकर पाटील,प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे, उपाध्यक्ष शिवाजी अंबुलगे ,कोषाध्यक्ष चंनबसप्पा निलंगेकर ,विकास सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ बिराजदार,श्री जयशंकर हुरदळे ,श्री रमाकांत निलंगेकर, प्राचार्या सौ.अनिता पाटील, माजी प्राचार्य शिवाजी मुळे,प्रा. अशोक कदम श्री मनोहर गायकवाड सर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यानंतर सत्कारमूर्ती श्री जगन्नाथ संगनाथ आंबुलगे व सौ प्रभावती जगन्नाथ आंबुलगे यांचा संस्थेच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने भर पेहराव आहेर आणि श्री गणेशाची व महात्मा बसवेश्वराची मूर्ती देऊन भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. जगु मामा यांच्या 40 वर्षाच्या सेवक पदाच्या कार्याविषयी संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिवाजी अंबुलगे यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमाशंकर पाटील यांनी करते- वेळी जगू मामांच्या जीवनाच्या विविध पैलू विषयी,कार्याविषयी गौरव- उद्गार काढून त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देऊन अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पी. सी. पाटील सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्रा. भारत चव्हाण यांनी मांडले या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच श्री विकास वाघमारे ,उपसरपंच इरफान मुलानी, जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष शिवकुमार पाटील, श्री विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री बसवराज धाराशिवे यांनीही जगन्नाथ अंबुलगे यांचा संस्थेच्या वतीने फेटा,शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला, तसेच विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत ,बचत गट, महिला भजनी मंडळ इत्यादी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे माजी कर्मचारी गावातील सेवानिवृत्त शिक्षक,माजी मुख्याध्यापक , शिक्षक व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने