उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना पीक फवारणी साहित्य वाटप

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना पीक फवारणी साहित्य वाटप 
शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी यांचा उपक्रम 
लातूर : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोंद्री मोड (औसा) येथे महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी यांच्यावतीने शेतकऱ्यांना पीक फवारणी औषधाचे वाटप करण्यात आले. 
शेतकऱ्यांना सध्या शेतीमालाला भाव नाही. पीकविमा मिळाला नाही. अशा परिस्थितीत यावर्षी पाऊस चांगला झाला आहे आणि पिकाला सध्या फवारणीच्या औषधाची गरज आहे, ही जाणीव ठेवून संतोष सोमवंशी यांनी १२०० शेतकऱ्यांना पीक फवारणी औषधाचे वाटप केले.
उद्धव ठाकरे यांंच्या वाढदिवसानिमित्त गेली दहा वर्षे संतोष सोमवंशी यांंच्यावतीने नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया शिबिरे, दिव्यांगांना साहित्य वाटप, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात फवारे वाटप, औसा किल्ला येथे शस्त्र प्रदर्शन, शालेय साहित्य वाटप, छत्री वाटप, असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले गेले. यावर्षी अडचणीत असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना खरीप पिकांवर फवारणीसाठी औषधांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, उपतालुकाप्रमुख नारायण भोसले, शाहूराज जाधव, श्रीहरी काळे, होळी चेअरमन, नंदकुमार पाटील, हासेगाव व्हाईस चेअरमन संगमेश्वर बावगे, धानोरा चेअरमन विक्रम पाटील, लोदगा चेअरमन शरद भाईबार, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, शरद गरड, लोदगा व्हाईस चेअरमन चंद्रकांत तळेगावे, इंद्रजीत शेंडगे, आप्पासाहेब सरवदे, मारुती मगर, इनुस बोपले, संजीव सोमवंशी, सुनिल खंडागळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने