विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेत. सह.सा. कारखान्यात ७८ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण संपन्न

 विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेत. सह.सा. कारखान्यात ७८ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण संपन्न


विलासनगर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. विलासनगर ता.जि. लातूर येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी मा.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. श्रीशैल उटगे यांच्या हस्ते कारखाना साईटवरील प्रशासकिय इमारतीसमोर सकाळी ठीक १०.०१ वाजता ध्वजारोहण करण्यांत आले. सदर प्रसंगी माजी मंत्री सहकार महर्षी मा.श्री दिलीपरावजी देशमुख यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वाना समता व बंधुत्वाचा संदेश दिला.

यावेळी जागृतीचे व्हा चेअरमन, श्री लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन, श्री. प्रमोद जाधव, विलास कारखान्याचे व्हा. चेअरमन, रवी काळे, संचालक गुरुनाथ गवळी, गोविंद डुरे, संजय पाटील, बिडवे, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक संभाजी रेड्डी, लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जगदीश बावणे, मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, व्हा. चेअरमन सचिन पाटील, इंदिरा सुत गिरणीचे चेअरमन बाळासाहेब कदम, लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे. माजी व्हा. चेअरमन, पृथ्वीराज शिरसाट, माजी अध्यक्ष कॉग्रेस सेवादल श्री रमेश सुर्यवंशी, सचिन दाताळ, संभाजी सुळ व विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच कारखान्यांचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री. पंडित देसाई, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने