सप्ताह सहसंपर्कप्रमुख सोमवंशी यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीचा शुभारंभ

औसा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा सप्ताह सहसंपर्कप्रमुख सोमवंशी यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीचा शुभारंभ  
लातूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार औसा विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
या अभियानांतर्गत शिवसेना सह संपर्कप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या उपस्थितीत उजनी येथे गणेशनाथ मंदिरात दर्शन घेऊन शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी शुभारंभ करण्यात आला. 
शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी प्रत्येक शिवसैनिकांनी सक्रिय सहभागी व्हावे व औसा विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन संतोष सोमवंशी यांनी यावेळी केले.
उजनी येथील आठवडी बाजारात सर्व व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखरअण्णा चव्हाण, बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव, बसवराज बरदापूरे, ॲड. दिपक वळके, एकंबीचे सरपंच काका पाटील, बंजारा ब्रिगेड तालुकाध्यक्ष राम चव्हाण, बाळकृष्ण कदम, उपतालुकाप्रमुख श्रीधर साळुंके, गणेश जाधव, विजय पवार, सरपंच सुरेश मुसळे, किशोर भोसले, श्रीहरी उत्के, माजी सरपंच बेलपान कास्ते, सोहेब शेख, अमित मुकडे, सुनिल जाधव, महेश जोशी, बाबा सगर, विकास वळके, सागर चव्हाण, उमाकांत सूर्यवंशी, काकासाहेब जवदराव, माऊली ढवण व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने